अकोट,अकोला मूर्तिजापूर शहरात लस नोंदणीत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:28+5:302021-04-01T04:19:28+5:30

आधार नोंदणी केंद्रावर बायोमेट्रिक थंम्ब असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने अकोला शहर मूर्तिजापूर शहर व अकोट शहर ...

Obstacles in vaccination registration in Murtijapur city of Akot, Akola | अकोट,अकोला मूर्तिजापूर शहरात लस नोंदणीत अडथळे

अकोट,अकोला मूर्तिजापूर शहरात लस नोंदणीत अडथळे

Next

आधार नोंदणी केंद्रावर बायोमेट्रिक थंम्ब असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने अकोला शहर मूर्तिजापूर शहर व अकोट

शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित असेपर्यंत आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्याचे आदेश २४ फेब्रुवारीला दिले आहेत. त्यामुळे गत महिनाभरापासून आधार नोंदणी केंद्रे बंद आहेत. कोरोना लसीकरणसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. अनेक नागरिकांच्या आधारकार्डवरील नावांत चुका आहेत,अनेकांचे वय चुकले आहे तर अनेकांनी तर आतापर्यंत आधारकार्ड काढले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिममध्ये आधारकार्डची अट अडसर ठरत आहे. अशास्थितीत सर्वत्र सूट मिळत असताना कोरोनासंबंधित नियमावली आखून आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करणे आवश्यक असल्याचे जाणवत आहे. ग्रामीण भागात आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू आहेत. या ठिकाणी शहरातील लोक धाव घेत असल्याने गर्दी होत आहे त्यामुळे अकोला अकोला मूर्तिजापूर शहरातील आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Obstacles in vaccination registration in Murtijapur city of Akot, Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.