लिलाव झालेल्या शेत जमिनीच्या वहितीत अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:54+5:302021-07-05T04:13:54+5:30

शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया करून एक वर्षासाठी सिरसो येथील भाग क्रमांक १ मधील ५ हेक्टर १० आर जमीन ...

Obstruction in the flow of auctioned farm land; Charges filed against three | लिलाव झालेल्या शेत जमिनीच्या वहितीत अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लिलाव झालेल्या शेत जमिनीच्या वहितीत अडथळा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया करून एक वर्षासाठी सिरसो येथील भाग क्रमांक १ मधील ५ हेक्टर १० आर जमीन सुनील ढवळे राहणार सिरसो यांनी वहितीसाठी घेतली होती. परंतु लक्ष्मीबाई देशमुख याचे वारसदार असल्याचे सांगून ज्योती विजय देशमुख, साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख यांनी शेत जमीन पेरणीस मज्जाव केला आहे. येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या दीडशे एकरमधील ९३ एकर शेत जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी अतिक्रमणमुक्त करून लिलावात काढली. ही जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असून वेगवेगळ्या लोकांनी बोली लावून वहितीसाठी घेतली. २५ जून रोजी फिर्यादी सुनील मनोहर ढवळे राहणार सिरसो त्यांना जमिनीचा ताबा दिला असता, शेतीची टॅक्टरद्वारे मशागत करीत असता लक्ष्मीबाई देशमुख यांच्या काही वारसांनी या शेतीच्या मशागतीच्या कामात अडथळा आणून काम बंद पाडले व फिर्यादी सुनील ढवळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल

आरोपी ज्योती विजय देशमुख, साक्षी विजय देशमुख व उल्हास दिनकर देशमुख सर्व रा. मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ४४७, ३४१,२९४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. लक्ष्मीबाईंच्या वारस ज्योती विजय देशमुख यांनी रविवारी शेत वहिती करण्यासाठी मज्जाव केला असता, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलिसांनी ज्योती देशमुख सदर जमीन शासनाच्या अधिनस्थ असल्याचे सांगितले. परंतु त्यांनी ऐकून न घेतल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Obstruction in the flow of auctioned farm land; Charges filed against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.