शिवजयंतीनिमित्त ५१ जणांनी केला नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:53 AM2021-02-20T04:53:39+5:302021-02-20T04:53:39+5:30
कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करण्यात आले. यावेळी तेल्हारा तहसीलदार गुरव, ठाणेदार शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. ...
कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करण्यात आले. यावेळी तेल्हारा तहसीलदार गुरव, ठाणेदार शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक तापडिया, डॉ.मुरकर, नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, प्रा.दबडघाव, कायंदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात वैद्यकीय अधिकरी तापडिया यांनी नेत्रदात्यांना मार्गदर्शन केले. यावेळी लॉकडाऊन काळात शहरातील अनेक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी समिती, जय बजरंग मंडळ, आसरा माता मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. या अभिनव उपक्रमात पोलीस उप निरीक्षक निलेश देशमुख, प्रा. दबडघाव, रामा फाटकर, किशोर डांबरे, सचिन थाटे, शिवानी थाटे, माया थाटे, माधुरी थाटे, जयश्री पुडकर, सुनील राठोड, गजानन गायकवाड, आरती गायकवाड,नंदकिशोर मुंजाळे, स्वप्नील सुरे, दीपा ठाकरे, महेश सुरे, आशिष देशमुख, प्रणय देशमुख, रेणुका देवकते, उज्वला सकारकर, विशाल दामोदर, भैया देशमुख, रेखाताई डांबरे, अशोक गव्हाळे आदींनी नेत्रदानाचा संकल्प केला.