अडगाव बंद प्रकरण; आठ आरोपींना जामीन

By admin | Published: February 5, 2017 02:19 AM2017-02-05T02:19:18+5:302017-02-05T02:19:18+5:30

फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

Offense closed case; The eight defendants bail | अडगाव बंद प्रकरण; आठ आरोपींना जामीन

अडगाव बंद प्रकरण; आठ आरोपींना जामीन

Next

हिवरखेड(अकोला), दि. ४- फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री अडगाव बु. येथील आठ जणांना अटक केली होती. त्यांना ४ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अडगाव बु. येथील शुभम ठाकूर या युवकाने १ फेब्रुवारी बुधवार रोजी अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र, मजकूर फेसबुक टाकल्यामुळे अडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अडगाव बु. येथील काही युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप घेऊन जबरीने अडगाव ह्यगाव बंदह्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच इतर ग्रामस्थांना शिवीगाळ, दगडफेक केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी अडगाव बु. येथील ५0 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील वसीम खा सलीम खा, मो. इरफान मो. अजीज, शे. आसीफ शे. खालीक, अनवर खा रसीद खा, आबिदअली जाफरअली व शे. यासीन शे. हुसेन, शे. आमीर शे. खालीक, काजीम हुसेन यांना अटक केली होती.
या आठही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुढील तपास ठाणेदार कात्रे, उपनिरीक्षक शरद भस्मे, गोपाल दातीर, योगेश राठोड, महादेव शेंडे व सुनील धार्मिक आदी करीत आहेत. या प्रकरणाचे पडसाद गावामध्ये अजूनही कायम असल्याचे जाणवते.

Web Title: Offense closed case; The eight defendants bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.