दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांची दांडी

By admin | Published: July 5, 2017 07:50 PM2017-07-05T19:50:20+5:302017-07-05T20:12:23+5:30

बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार

Officers, Employees' Dakshin in the name of tour | दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांची दांडी

दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांची दांडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : दौऱ्याच्या नावाखाली बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुपारी १.३० वाजताच दांडी मारल्याचे चित्र ५ जुलै रोजी आढळले. विशेष म्हणजे, प्रभारी तालुका कृ षी अधिकारी, अधीक्षक व कार्यालयीन कृ षी अधिकारीदेखील उपस्थित नव्हते.
बार्शीटाकळी तालुका कृ षी अधिकारी कार्यालयात ५ जुलै रोजी फेरफटका मारला असता कृ षी विभागात फक्त ७ ते ८ कर्मचारी उपस्थित होते. बार्शीटाकळी गावापासून तालुका कृ षी कार्यालय चार कि.मी. अंतरावर आळंदा फाट्यावर आहे. खरीप हंगाम सुरू आहे. कुणा शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे, कुणाला कल्चर पाहिजे, कुणाला कृ षी सल्ला पाहिजे. चार कि.मी. अंतर कापून कृ षी विभागात पोहोचलेल्या शेतकऱ्यांना यांपैकी काहीच मिळत नाही. कारण कृ षी कार्यालयात एकही कृ षी कर्मचारी सापडत नाही. ही स्थिती ३ जुलैपासून सुरू आहे. चपराशी, कारकूनच फक्त हजर असतात व कृ षी अधिकाऱ्यांबाबत विचारले, की सांगतात अधीक्षक बँकेत गेलेत, कृ षी अधिकारी सभेला गेले. ही मंडळी वैयक्तिक कामानिमित्त गेल्याचे आढळून आले आहे. त्यापूर्वी उपविभागीय अधिकारी सोळंके यांनीदेखील तालुका कृ षी कार्यालयाचा फेरफटका मारला. त्यांनाही हीच परिस्थिती आढळली; मात्र दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.

कृ षी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांना पेरणी झाल्यावर २८ व २९ जून रोजी बियाणे लावण्याकरिता कृ षी विभागाने कल्चर वाटले. आमच्याकडील पेरणी १६ जून रोजीच सुरू झाली.
- संदीप चौधरी,
अध्यक्ष, आत्मा समिती, बार्शीटाकळी.

कृ षी अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावरच असतात.
- सुरेश इवनाते,
बार्शीटाकळी प्रभारी तालुका कृ षी अधिकारी

Web Title: Officers, Employees' Dakshin in the name of tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.