जिल्हाधिकाऱ्यांसह अकोल्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्राण शपथ!

By संतोष येलकर | Published: October 6, 2023 02:49 PM2023-10-06T14:49:14+5:302023-10-06T14:49:26+5:30

'अमृत कलश यात्रे'द्वारे जिल्हाधिकारी निवासस्थानी मृद संकलन

Officers-employees of Akola along with District Collector took Panchprana Oath! | जिल्हाधिकाऱ्यांसह अकोल्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्राण शपथ!

जिल्हाधिकाऱ्यांसह अकोल्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्राण शपथ!

googlenewsNext

संतोष येलकर, अकोला: ‘माझी माती माझा देश’ अभियानात महापालिकेच्यावतीने अकोला शहरात विविध ठिकाणी, घरोघर माती गोळा करण्यात येत आहे. या उपक्रमात शुक्रवारी जिल्हाधिकरी यांच्या शासकीय निवासस्थानी माती गोळा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह  विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांनी पंचप्राण शपथ घेतली.

अमृत कलश यात्रेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या निवासस्थानीही माती गोळा करण्यात आली. जिल्हाधिकारी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुंभार, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे अभियान देशासाठी जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांना समर्पित आहे. अभियानात शहरातील प्रत्येक परिसरातील नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी   कुंभार यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येत आहे.  ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येणार आहे.त्यानंतर हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी श्री. महल्ले यांनी दिली.   

Web Title: Officers-employees of Akola along with District Collector took Panchprana Oath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला