अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली आपत्ती निवारणासाठी सक्रीय राहण्याची शपथ !
By संतोष येलकर | Published: October 13, 2023 07:37 PM2023-10-13T19:37:35+5:302023-10-13T19:37:49+5:30
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन : जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम
अकोला : आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात अधिकारी व कर्मचा-यांनी आपत्ती निवारणासाठी सदैव सक्रिय राहण्याची शपथ घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्याना शपथ दिली. आपत्ती निवारणाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवून आपत्तीपासून समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन व अशा कार्यात सक्रिय सहभाग घेईन, अशा आशयाची शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक अधीक्षक शिवहरी थोंबे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शाळा महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी घेतली शपथ !
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हयातील विविध शाळा- महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्य आणि जिल्हास्तरावर आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.