ग्रामस्वराज अभियानात अधिकारी, पदाधिकारी महत्त्वाचे घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:29+5:302021-02-06T04:32:29+5:30

पातूर येथील संत सेवालाल भवनमध्ये आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत अधिकारी, पदाधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात ...

Officers, office bearers are important elements in Gramswaraj Abhiyan | ग्रामस्वराज अभियानात अधिकारी, पदाधिकारी महत्त्वाचे घटक

ग्रामस्वराज अभियानात अधिकारी, पदाधिकारी महत्त्वाचे घटक

Next

पातूर येथील संत सेवालाल भवनमध्ये आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत अधिकारी, पदाधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होती. या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे होते.

कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे, उपसभापती नजमुन्निसा मो. इब्राहिम, पंचायत समिती सदस्य अनिल इंगळे, सुनीता अर्जुन टप्पे, नीमा अनिल राठोड, अर्चना विष्णू डाबेराव, नंदू भाऊ डाखोरे, कार्यशाळा प्रमुख ॲड. अनिता राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते. कार्यशाळेत ॲड. अनिता राजेंद्र गुरव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय घाडगे, रितेश घाटोळ, जयेश तायडे, राहुल अरखराव, सचिन इंगळे गांधारे, ओम पुरी, हेमंत घुगे, संजय खर्डे आदींनी परिश्रम घेतले.

फोटो:

Web Title: Officers, office bearers are important elements in Gramswaraj Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.