तीन दिवसांच्या सुटीनंतर आज उघडणार कार्यालये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:17 AM2020-12-29T04:17:46+5:302020-12-29T04:17:46+5:30

हातपंप दुरुस्तीची कामे सुरू ! अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात नादुरुस्त असलेली हातपंप दुरुस्तीची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा ...

Offices to open today after three days holiday! | तीन दिवसांच्या सुटीनंतर आज उघडणार कार्यालये !

तीन दिवसांच्या सुटीनंतर आज उघडणार कार्यालये !

Next

हातपंप दुरुस्तीची कामे सुरू !

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात नादुरुस्त असलेली हातपंप दुरुस्तीची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिक विभागामार्फत सुरू आहेत. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करून सुरू करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस. बी. मेंढे यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागात

उपअभियंत्यांची पदे रिक्त !

अकोला : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत उपअभियंत्यांची तीन पदे रिक्त आहेत. या विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त असून, रिक्त कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार उपअभियंता गायकवाड सांभाळीत असून, तेदेखील १ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

वातावरणात गारवा !

अकोला : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरल्याचे जाणवत आहे. वाढती थंडी आणि वातावरणात गारवा पसरल्याने, नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर करण्यात येत आहे.

उमेदवारांची धावपळ !

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासह जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याकरिता उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

Web Title: Offices to open today after three days holiday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.