कार्यालये बंद; पांडेबुवांची दांडी!
By admin | Published: September 2, 2016 01:53 AM2016-09-02T01:53:17+5:302016-09-02T01:53:17+5:30
नागरिकांना बसावे लागते ताटकळत; सहन करावे लागतात हेलपाटे. लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून वास्तव अधोरेखित.
अकोला, दि. १: शहरात अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय कार्यालयीन वेळेत राहत असल्याने, पांडेबुवा म्हणून ओळखले जाणारे तलाठी कार्यालयांना दांडी मारत आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात येणार्या नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असल्याची बाब बुधवारी ह्यलोकमतह्णने केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये चव्हाट्यावर आली.
तलाठी ह्यसाझाह्णच्या ठिकाणी तलाठी कार्यालयांमध्ये सात-बारा, फेरफार नोंदी, नमुना ८ -अ, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, तलाठी दप्तर अद्ययावत करणे इत्यादी प्रकारची कामे केली जातात. तलाठी कार्यालयाची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंतची आहे. या कार्यालयीन वेळेत तलाठी कार्यालय सुरू असणे, कार्यालयात तलाठी उपस्थित असणे आणि नागरिकांची विविध कामे होणे अपेक्षित आहे; मात्र अकोला शहरातील अनेक तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत बंद राहत असून, तलाठी कार्यालयांना दांडी मारत असल्याने, विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात येणार्या नागरिकांना तलाठी कार्यालय केव्हा उघडणार, याबाबत प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागते. तसेच कार्यालय बंद आणि तलाठी कार्यालयात हजार नसल्याने, नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असल्याचे आढळून आले.
कार्यालय सुरू; पण तलाठी गायब!
मंगळवारी दुपारी २ वाजता शहरातील मोरेश्वर कॉलनी परिसरातील तलाठी कार्यालय सुरू होते; मात्र कार्यालयात तलाठी उपस्थित नव्हते. संबंधित तलाठय़ाने मानधनावर नेमलेला एक कर्मचारी तलाठी कार्यालयात काम करीत असल्याचे आढळून आले.
असे आढळून आले वास्तव!
सोमवारी दुपारी ३ वाजता शहरातील गोरक्षण रोडस्थित माधवनगरातील तलाठी कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.
मंगळवारी दुपारी २.३0 वाजता मोठी उमरी ग्रामपंचायत इमारतीमधील तलाठी कार्यालय बंद आढळून आले.
बुधवारी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील कौलखेड रोडस्थित आरोग्य नगरमधील तलाठी कार्यालय बंद आढळून आले. १२ वाजता कार्यालय उघडण्यात आले. तोपर्यंत कार्यालय केव्हा उघडणार, यासाठी नागरिक ताटकळत कार्यालयाबाहेर बसले होते.
-कार्यालयीन वेळेत साझाच्या ठिकाणी तलाठी कार्यालय सुरू असणे आणि कार्यालयात तलाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. कार्यालय बंद आणि कार्यालयात तलाठी उपस्थित नसल्याचे आढळून आले असेल तर, संबंधित तलाठय़ांना यासंदर्भात नोटीस बजावून, खुलासा मागविण्यात येणार आहे.
- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला