वीज कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे होणार मुल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:02 PM2020-06-12T18:02:38+5:302020-06-12T18:02:44+5:30
वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी कर्मचाºयांचे काम व जबाबदाºयांचे लवकरच मुल्यमापण करण्यात येणार आहे.
अकोला : वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी कर्मचाºयांचे काम व जबाबदाºयांचे लवकरच मुल्यमापण करण्यात येणार आहे. महावितरण कंपनी मध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाºयांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शुक्रवारी संबंधीत अधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
महावितरणमध्ये आकृतीबंधानुसार असलेल्या अधिकारी-कर्मचाº्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाºयांचे पुर्नमुल्यांकन करुन ही पदे खरोखरच आवश्यक आहेत का, या बाबत आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकाºयांचा भरणा मोठया प्रमाणात असून कंपनी नियमानुसार महावितरणची क्षमतावृध्दी अपेक्षित आहे. तथापि या विभागाशी संबंधीत उद्भवणाºया उणीवांबाबत असंख्य तक्रारी येत असतात याचाच अर्थ महावितरणच्या प्रणालीमध्ये दरी असल्याचे आढळून येते. तसेच रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचाº्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर आहे, त्यामुळे तरुणांच्या रोजगाराची संधी हिरावल्या जाते. महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान शाखेत सुमारे ५५० पदे असताना सुध्दा या क्षेत्रात हवी ती उंची गाठता आलेली नाही . राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यामध्ये सुसुत्रता निर्माण होऊ शकली नाही त्यामुळे या शाखेला सुधारणे, अद्ययावत करणे महत्वाचे आहे.
महावितरणच्या वित्त विभागात देखील मोठया प्रमाणात पदे अस्तित्वात असून या क्षेत्रातही महावितरणचे काम समाधानकारक नाही. या व्यतिरिक्त महावितरणच्या जनसंपर्क विभागाने माहिती बरोबरच तक्रार निवारणाच्या कामात सहाय्य करणे आवश्यक आहे, या दृष्टीने सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामांचे, त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाºयांचे पुनर्मुल्यांकन करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संचालक(मानव संसाधन) महावितरण यांना देण्यात आले.