अधिकार्यांच्या दालनातील दस्तऐवजही असुरक्षित!
By admin | Published: September 12, 2014 01:12 AM2014-09-12T01:12:51+5:302014-09-12T01:12:51+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन: अकोला येथील शासकीय कार्यालयांची सुरक्षा वार्यावर.
अकोला: जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या दस् तऐवजाबाबत शासकीय कार्यालयात बाळगल्या जात असलेला निष्काळजीपणा ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी केलेल्या ह्यस्टिंग ऑ परेशनह्णमध्ये उजेडात आला. सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी हजर नसताना, त्यांच्या टेबलवरील महत्त्वाच्या फाईलची काळजी घेण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याचे यावेळी आढून आले.
विविध सरकारी -निमसरकारी कार्यालयांमध्ये विभागप्रमुखांच्या कक्षात शासनाचे निर्णय, राबविण्यात येणार्या योजना, अंमलबजावणीसंदर्भात आदेश-निर्देश, करण्यात आलेली कार्यवाही व इतर प्रकारचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज व वेगवेगळ्या नस्ती (फाईल्स) ठेवलेल्या असतात. प्रशासनाच्या कामकाजाबाबतच्या अनेक गो पनीय फाईलसुद्धा यात असतात. या फाईल अधिकार्यांच्या अनु पस्थितीतही त्यांच्या टेलबवर विखुरलेल्या असताना त्याची सुरक्षा करणारे कोणीही लोकमत चमूला आढळून आले नाही. प्रामुख्याने लोकांचा संपर्क अधिक असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व अकोला तहसील कार्यालया तील सुरक्षा व्यवस्था या निमित्ताने चव्हाट्यावर आली.
** तहसीलदारांच्या कक्षातील बेवारस स्थितीतील महत्त्वाची फाईल उचलताना लोकमत प्रतिनिधी. ही फाईल घेऊन त्यांच्या कक्षातून बाहेर पडल्यानंतर कोणीही त्यांना विचारणा केली नाही.
** असे आढळून आले वास्तव!
दुपारी २.४९ वाजता महानगरपालिका बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता त्यांच्या कक्षात हजर नव्हते; मात्र त्यांच्या टेबलवर विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ह्यफाईल्सह्ण पडलेल्या आढळून आल्या.
दुपारी ३.२३ वाजता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अ ितरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कक्षात उपस्थित नसताना, त्यांच्या टेबलवर, शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना व इतर प्रकारच्या फाईल्स पडलेल्या दिसत होत्या.
दुपारी ३.४२ वाजता अकोला तहसील कार्यालयात तहसीलदार त्यांच्या कक्षात उपस्थित नसताना, त्यांच्या टेबलवर महत्त्वाच्या फाईल्स पडलेल्या आढळून आल्या.
या तीनही कार्यालयात संबंधित अधिकारी उपस्थित नसताना, कक्षात येणार्या-जाणार्यांना हटकण्यासाठी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले.