मनपात पहिल्यांदाच ऑफलाइन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:43+5:302021-06-16T04:25:43+5:30
सभागृहात नियमांचे उल्लंघन अकाेला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात साेमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ...
सभागृहात नियमांचे उल्लंघन
अकाेला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात साेमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी सभागृहात नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांमध्ये तीन फूट अंतर राखण्यात आल्याचे दिसले नाही. आयुक्त निमा अराेरा यांच्या बाजूलाच महापाैर व उपमहापाैर विराजमान हाेते. यावेळी सभागृहात काेराेना नियमांचे उल्लंघन झाल्याचे समाेर आले.
लसीकरण केंद्रांमधील गर्दी ओसरली
अकाेला : मागील काही दिवसांपासून शहरात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे अकाेलेकर गाफील राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, लसीकरण केंद्रांमधील गर्दी ओसरल्याचे समाेर आले आहे. लस घेण्यासाठी ऑनलाइन अपाॅइंटमेंटची तरतूद असली तरीही नागरिक अपाॅइंटमेंट घेत नसल्याची माहिती आहे.
स्वच्छता विभागाचा प्रभार बिडवेंकडे!
अकाेला : मागील काही दिवसांपासून महापालिकेतील स्वच्छता व आराेग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. शहरात साफसफाईची समस्या निर्माण झाली असताना हा विभाग ढिम्म असल्याचे समाेर आले आहे. ही बाब लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी या विभागाचा अतिरिक्त प्रभार नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात साेमवारी सभागृहात आयुक्तांनी सांगितले.