जिल्ह्यातील ऑईलमिल उद्योग संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:39+5:302021-05-06T04:19:39+5:30

अकोला : संचारबंदी लागू असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या ऑईलमिल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वेळेचे बंधन ...

Oilmill industry in crisis in the district! | जिल्ह्यातील ऑईलमिल उद्योग संकटात!

जिल्ह्यातील ऑईलमिल उद्योग संकटात!

Next

अकोला : संचारबंदी लागू असल्याने कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या ऑईलमिल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वेळेचे बंधन आहे. परिणामी, परजिल्ह्यात जाणाऱ्या मालाची विक्री ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑईलमिल उद्योग संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात कृषी मालावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये जवळपास २ हजार ऑईल मील आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकी, ढेप पेंड तयार करण्यात येते. येथून नाशिक, पुणे, चाळीसगाव, जळगाव अशा मोठ्या शहरात माल विक्रीसाठी जातो. जवळच वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात धान्य पट्टा असल्याने उद्योगाला उभारी मिळाली; परंतु वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ६वेळोवेळी होणाऱ्या लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भीषण रूप पाहता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. तरीही या संचारबंदीचा परिणाम या क्षेत्रावर दिसून येत आहे. माल विक्री होत नसल्याने ५० टक्के माल पडून राहत आहे. अत्यावश्यक सेवेत असतानाही ऑईल मिल उद्योग संकटात आला आहे.

--बॉक्स--

वेळेच्या बंधनामुळे वाढली अडचण

राज्यात संचारबंदी लागू आहे. सकाळी ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे. या वेळेत आवश्यक त्या प्रमाणात माल विक्री होत नाही. त्यामुळे माल विक्री घटली आहे.

--बॉक्स--

जिल्ह्यातील ऑईलमिल उद्योग

२,०००

शहरातील ऑईलमिल उद्योग

३५

--बॉक्स--

बेरोजगार संचारबंदीत ऑईलमिल, दालमिलकडे वळले!

जिल्ह्यात संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. या कठीण काळात अनेकजण दालमिल, ऑईलमिलमध्ये काम करीत उदरनिर्वाह सुरू आहे.

--कोट--

इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या मालाची ५० टक्के विक्री होत आहे. त्या ठिकाणी केवळ तीन-चार तास दुकाने उघडी राहत असल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

- वसंत बाछुका, सचिव, ऑईलमिल असोसिएशन

Web Title: Oilmill industry in crisis in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.