जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडली

By admin | Published: September 26, 2014 01:46 AM2014-09-26T01:46:08+5:302014-09-26T01:46:08+5:30

अकोला मनपाची कारवाई; रस्ता रुंदीकरणाची सबब.

An old bus station was excited | जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडली

जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडली

Next

अकोला : टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाची अतिक्रमित आवारभिंत मनपा प्रशासनाने जमीनदोस्त करण्याची कारवाई गुरुवारी केली. टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंत रस्ता रुंदीकरणासाठी सदर भिंत पाडण्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक ए.एम. सोले यांनी स्पष्ट केले.
टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंत रस्ता रुंदीकरणासाठी जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडण्याची कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी केली. कारवाई करतेवेळी बस स्थानक परिसरातील विविध साहित्य विक्री करणार्‍या व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली. मनपाने अचानक कारवाई केल्यामुळे एसटी प्रशासनासह या ठिकाणच्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. तत् पूर्वी दुपारी जिल्हाधिकार्‍यांसह मनपा अधिकार्‍यांनी टॉवर चौक ते फतेह चौकपर्यंंतच्या मार्गाची पाहणी केली. त्यावेळी बस स्थानकाची आवारभिंत दहा फूट रस्त्यावर येत असल्यामुळे ती पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. यानंतर अतिक्रमण विभागाने रेल्वे स्टेशन चौकातील पोलिस चौकी हटवली.

Web Title: An old bus station was excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.