‘पीएम’ आवास योजनेचा जुने शहरात श्रीगणेशा

By admin | Published: April 18, 2017 01:42 AM2017-04-18T01:42:54+5:302017-04-18T01:42:54+5:30

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील ५४ घरकुलांचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला.

In the old city of PMH housing scheme, | ‘पीएम’ आवास योजनेचा जुने शहरात श्रीगणेशा

‘पीएम’ आवास योजनेचा जुने शहरात श्रीगणेशा

Next

पालकमंत्र्यांच्या हस्ते ५४ घरकुलांचे उद्घाटन

अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात झोपडपट्ट्यांचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील ५४ घरकुलांचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. योजनेचा पहिला मान भास्कर मुरेकर आणि जयश्री मुरेकर या अंध दाम्पत्याला देण्यात येऊन, त्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले.
‘पीएम’ आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ कृती आराखडा अंतर्गत मनपा क्षेत्रात शून्य कन्सलन्टसीने केलेल्या सर्व्हेनुसार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागाचा सर्व्हे करण्यात आला. जुने शहरातील शिवसेना वसाहत, न्यू गुरुदेवनगर, रामदासपेठ परिसरातील मातानगर आदी भागातील १ हजार २४१ घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची निवड केली. मंजूर लाभार्थींच्या घरकुलाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. महापौर विजय अग्रवाल, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, भाजप महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेवक राजेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते घरकुलाचे भूमिपुजन पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अजय लहाने यांनी केले. संचालन क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांनी केले. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सपना नवले, जयश्री दुबे, गजानन चव्हाण, अमोल गोगे, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे, सारिका जयस्वाल, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, तुषार भिरड, जान्हवी डोंगरे, विलास शेळके, पवन पाडिया, दिलीप देशमुख, सुरेश अंधारे आदी उपस्थित होते.

Web Title: In the old city of PMH housing scheme,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.