चार वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 17:27 IST2018-10-14T17:24:06+5:302018-10-14T17:27:23+5:30
हिवरखेड (अकोला): एका चार वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची घटना १३ आॅक्टोबर रोजी हिंगणी खुर्द येथे घडली.

चार वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाचा अत्याचार
हिवरखेड (अकोला): एका चार वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची घटना १३ आॅक्टोबर रोजी हिंगणी खुर्द येथे घडली. याप्रकरणी आरोपी वृद्धाविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
हिंगणी खुर्द येथील चार वर्षीय चिमुकली खेळत असताना तिला रामभाऊ हरिश्चंद्र सोनोने या वृद्धाने आपल्या घरी बोलावून नेले. तेथे त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. ही बाब चिमुकलीने घरी परतल्यानंतर आईला सांगितली. पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांनी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी रामभाऊ सोनोने याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२), पॉस्को अॅक्ट ३, ४ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आले असून, पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनत पीएसआय शरद माळी व गोपाल दातीर करीत आहेत. (प्रतिनिधी)