जवळा येथे वृद्धाचा खून
By admin | Published: April 19, 2017 01:33 AM2017-04-19T01:33:50+5:302017-04-19T01:33:50+5:30
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा शेतशिवारात एका ६५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना १७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली.
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा शेतशिवारात एका ६५ वर्षीय वृद्धाचा अज्ञात आरोपीने खून केल्याची घटना १७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. घटनेच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
बोरगाव खुर्द येथील गणपत फकीरसा डगवाले (६५) हे १७ एप्रिल रोजी जवळा शेतशिवारातील रमेश चौधरी यांच्या शेतात रखवालीकरिता गेले होते. दरम्यान, १७ एप्रिलच्या रात्री फकीरसा डगवाले यांचा पुत्र कैलास यास त्याचे वडील गणपतराव हे शेतात जखमी अवस्थेत पडले असल्याचे समजले. त्यावरून कैलासने शेतात जाऊन पाहिले असता, गणपतराव डगवाले हे गंभीर जखमी अवस्थेत पडून होते. त्यांच्या छातीवर, डोक्यावर कुणी तरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार कैलास डगवाले यांनी पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून बोरगाव मंजु पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, घटास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर, पीएसआय युवराज उईकेसह श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी अज्ञात मारेकरू कोण, याचा रात्रभर शोध घेतला; परंतु ते आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.