आषाढी एकादशिनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलला भक्तीचा मळा
By Atul.jaiswal | Published: July 17, 2024 06:12 PM2024-07-17T18:12:19+5:302024-07-17T18:12:43+5:30
पहाटे श्री विठ्ठल रुख्मिणीस महाभिषेक पूजा संपन्न झाली. अभिषेक पूजा सर्वसेवाधिकारी कृष्णा व अर्चना शर्मा यांचे हस्ते संपन्न झाली. पौरोहित्य दत्ता जोशी गोविंदराव परचुरे आशिष बलाखे यांनी केले. यावेळी विलास अनासने, सतीश ढगे रमेश अलकरी अनिल परचुरे आदी उपस्थित होते.
अकोला : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर गुरुवारी जुने शहरातील ३२० वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर संस्थान व अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
पहाटे श्री विठ्ठल रुख्मिणीस महाभिषेक पूजा संपन्न झाली. अभिषेक पूजा सर्वसेवाधिकारी कृष्णा व अर्चना शर्मा यांचे हस्ते संपन्न झाली. पौरोहित्य दत्ता जोशी गोविंदराव परचुरे आशिष बलाखे यांनी केले. यावेळी विलास अनासने, सतीश ढगे रमेश अलकरी अनिल परचुरे आदी उपस्थित होते.
मंदिर परिसरात ३ क्विंटल उसळीचे वाटप माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे तर्फे करण्यात आले. विठ्ठल मंदिर परिसरात प्रथेनुसार जत्रा भरली होती. यामध्ये बालकांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, हार फुले, प्रसाद, सजावटीच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधन, दागिने आदींची दुकाने थाटली होती. लहान मुले आणि स्त्रियांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
हा संपूर्ण आषाढी उत्सव धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, आनंद उगले, नितीन खोत, बबलू ठाकूर, महेश कडूस्कर, अधिवक्ता अंकुश जोशी, यशोधन गोडबोले, अण्णा कराळे, संजय गुर्जर, सचिन मुदिराज, नितीन विसपुते, संतोष बरडे, श्यामराव खोत, विनोद बरडे, उदय गंगाखेडकर, प्रतीक अलकरी, संदीप देशमुख, अशोक सांचेला, प्रशांत गावंडे, दिनेश संपन्न बंकुवाले, कुणाल ठाकूर, सुनील मुंदडा, अभिषेक चाळसे, संग्राम खानझोडे, कैवल्य अलकरी, शरद उमाळे, प्रसाद कुटासकर, किसन बंकुवाले, राहुल जुनगडे, पीयूष वाघ, मनीष कडूस्कर, प्रशांत गावंडे, गोविंद जोशी यश अलकरी, अजिंक्य अलकरी, रोहित खोत, प्रसाद जोगळेकर, सार्थक चाळसे, अभय निंबाळकर, देवा खिलोसिया, हर्ष शर्मा, ओम ठाकूर, पीयूष गुरुखुदे, उत्कर्ष शर्मा, संजय बंकुवाले, ओम भडके, यश ठाकूर, हर्ष सांचेला, कृष्णा सांचेला, श्री गंगाखेडकर, तिलक श्रीवास, पीयूष सुदालकर, देवाशिष बरडे, अथर्व अलकरी, कलश भगत यांच्यासह महिला कार्यक्रम प्रमुख यमुताई नळकांडे, अश्विनीताई हातवळणे तसेंच पदाधिकारी मंजूषा अलकरी, सुनीता कुलकर्णी, मेधा खानझोडे, पूनम चाळसे, उज्ज्वला अलकरी, अनघा परचुरे, छाया परचुरे, समृद्धी खानझोडे, संजीवनी अलकरी, सीमा ठाकूर, प्रणिता परचुरे, सुधा कडूस्कर, सोनल देशपांडे, अन्नपूर्णा गोखले, पद्मा बंकुवाले, रिना ठाकूर, उज्ज्वला अलकरी, ममता गंगाखेडकर, विद्या हातवळणे, पद्मजा खानझोडे, नंदा घोडके, किरण बंकुवाले, सुनीता देशमुख, राधिका मांडेकर, स्वाती ठाकूर, संध्या अलकरी, सुनीता चतुर, सोनल गंगाखेडकर, संतोषी बंकूवाले यांनी अथक परिश्रम घेतले.
नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर
या उत्सवाचे औचित्य साधून सप्ताह मंडळ व रोटरी क्लब अकोला नॉर्थ आणि ओल्ड सिटी अग्रवाल परिवार यांचे संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर मंदिर परिसरात पार पडले. या शिबिराचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये डॉ. जुगल चिराणिया, डॉ. सुरेश तारे व त्यांच्या चमुने शिबिरार्थीची तपासणी केली.