अकोल्यात ईदनिमित्त शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर

By नितिन गव्हाळे | Published: September 29, 2023 11:20 AM2023-09-29T11:20:46+5:302023-09-29T11:21:04+5:30

मुस्लीम बांधवांनी गणेश उत्सव मिरवणूकीमुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.

On the occasion of Eid in Akola, schools and colleges have been declared holiday on September 30 | अकोल्यात ईदनिमित्त शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर

अकोल्यात ईदनिमित्त शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर

googlenewsNext

अकोला, दि. २८ : श्री गणेशोत्सव मिरवणूक व ईद ए  मिलादुन्नबी मिरवणूक एकाच दिवशी असल्याने समाजात एकता, अखंडता असावी यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी मिरवणुक दि. ३० सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी दि. ३० सप्टेंबरला संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी असावी अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे जावेद जकारिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश निर्गमित करून, संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना दि. ३० सप्टेंबर रोजी शासकीय सुटी जाहीर केली आहे. मुस्लीम बांधवांनी गणेश उत्सव मिरवणूकीमुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. त्यामुळे ईद ए मिलादच्या पृष्ठभूमीवर ३० सप्टेंबर रोजी शासकीय सुटी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जकारिया फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

Web Title: On the occasion of Eid in Akola, schools and colleges have been declared holiday on September 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.