जिल्हयात पाच वर्षात दीड काेटींचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:43+5:302021-01-18T04:16:43+5:30
सचिन राऊत अकाेला : शहरासह जिल्ह्यात गत पाच वर्षात विविध पाेलीस स्टेशन तसेच स्थानीक गुन्हे शाखा आणि पाेलीस अधीक्षकांच्या ...
सचिन राऊत
अकाेला : शहरासह जिल्ह्यात गत पाच वर्षात विविध पाेलीस स्टेशन तसेच स्थानीक गुन्हे शाखा आणि पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अमली पदार्थांवर कारवाया करीत तब्बल १ काेटी ४३ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये काेकेन, गांजासह विविध पदार्थांचा समावेश आहे. या दरम्यान १०३ आराेपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये नायजेरियन तरुणाचाही समावेश आहे.
शहर पोलिसांनी २०१६ ते २०२० दरम्यान ४९ कारवायांमध्ये ५९० किलो गांजा जप्त केला. त्यानंतर तीन क्विंटल भांग तर ५०० ग्रॅम काेकेन जप्त केले आहे. या कारवायांमध्ये १०३ आराेपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर एका महिलेला स्थानबध्द करण्याची कारवाई अकाेला पाेलिसांनी केली आहे. जिल्ह्यात गांजाची तस्करी मध्य प्रदेश,तर दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून होत असल्याचे पोलिसानी सांगितले. अकाेला पाेलिसांना गांजा तसेच काेकेनची कारवाई केली असून गत महिन्यात पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दाेन क्विंटल भांग जप्त केली हाेती. गांजाची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात खेप येते. त्याचे शौकीनही मोठ्या संख्येने आहेत.
नायजेरीयन जेम्स अटकेत
अकाेल्यातील सिंधी कॅम्पमधील तरुणाना गांजा तसेच काेकेनचा पुरवठा करतांना स्थानिक गुन्हे शाखेने मुंबइतून नायजेरियन तरुण जेम्स याला अटक केली हाेती. जेम्सने अकाेल्यात माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री केल्याने हा आकडा वाढला आहे. तर अंमली पदार्थ विक्री प्रकरणात सहा महीन्यापूर्वी एका महीलेले एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.