तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:35 PM2020-01-11T12:35:30+5:302020-01-11T13:13:52+5:30
मलकापूरचे तलाठी दत्तात्रय काशीराम इंगळे (५२) यांनी सदानिका(फ्लॅट)ची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली.
अकोला : सातबारावर नोंद करण्यासाठी तक्रारकर्त्यास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया मलकापूरच्या तलाठ्यासह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी जिल्हा ग्रंथालय कार्यालयासमोर अटक केली.
४६ वर्षीय तक्रारकर्त्यास मलकापूरचे तलाठी दत्तात्रय काशीराम इंगळे (५२) यांनी सदानिका(फ्लॅट)ची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली; परंतु तक्रारर्त्यास लाच द्यायची नसल्याने, त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारकर्ता पैसे घेऊन तलाठी इंगळे याच्याकडे आला. तलाठ्याचा खासगी सहकारी ज्ञानेश्वर बळीराम कानकिरड (४0)सुद्धा तेथे होता. या दोघांनी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच, एसीबीने त्यांना अटक केली. ही कारवाई एसीबीचे श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, एएसआय गाडगे, दामोदर, गोमासे, संतोष दहीहांडे, अन्वर खान, सुनील येलोने, अभय बाविस्कर, इमरान अली, प्रवीण कश्यप, नीलेश शेगोकार, लता वानखडे व निशा धर्माळे यांनी केली. (प्रतिनिधी)