शेतीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 08:22 PM2017-11-13T20:22:26+5:302017-11-13T20:22:53+5:30
पंचगव्हाण येथे शेतातील धुर्यावरील काट्या तोडण्यावरून वाद होऊन चाकूने एकास गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली. हाफीज खा एहसान खा असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: तालुक्यातील पंचगव्हाण येथे शेतातील धुर्यावरील काट्या तोडण्यावरून वाद होऊन चाकूने एकास गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली. हाफीज खा एहसान खा असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पंचगव्हाण येथील शेतकरी हाफिज खा एहसान खा यांनी आपल्या शेतात धुर्यावरील काट्या तोडण्यासाठी मजूर पाठविले होते. यावरून वाद होऊन १२ नोव्हेंबरला रात्री अ. मुजाहीर अ. कदीर, अ. अजहर अ. मुजाहीर, अ. कौसर अ. मुजाहीर यांनी हाफिज खा यास चाकूने डोक्यावर, हातावर, अंगावर वार करून गंभीर जखी केले. या प्रकरणी आरोपी अ. मुज्जाहिर, अ. कौसर, अ. अजहर या तीन आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी भादंवि कलम ३0७,३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील पोलीस उपनिरीक्षक संतोष केदासे करीत आहेत.