६४ खेडी पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी एक कोटीचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:37 PM2019-02-15T13:37:21+5:302019-02-15T13:37:24+5:30
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी टंचाई अंतर्गत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांमार्फत गुरुवार, १४ फेबु्रवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी टंचाई अंतर्गत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांमार्फत गुरुवार, १४ फेबु्रवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडण्यात येते. तेथून योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र पाणी पुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या पंपांची पाणी फेकण्याची क्षमता कमी झाली असून, जलवाहिनीही ठिकठिकाणी शिकस्त झाली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना दररोज नियमित पाणी पुरवठा करणे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने २०१९ च्या पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची विशेष दुरुस्ती करणे तसेच या योजनेंतर्गत उगवा या समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी अंदाजपत्रकीय कि मतीनुसार ९९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांमार्फत १४ फेबु्रवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.