अकोल्यात गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 02:13 PM2018-06-17T14:13:59+5:302018-06-17T14:13:59+5:30
अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला.
अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा मोठा साठा थेट दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे अकोल्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुसर गावानजीक गुटख्याचा मोठा ट्रक पकडून गुटखा जप्तीची कारवाई केली.
राज्य शासनाने विविध प्रकाराच्या तंबाखूमिश्रित गुटख्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात तंबाखूमिश्रित गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे अळसपुरे यांनी केलेल्या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दिल्लीवरून एच. आर. ३८-०९४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सुमारे ५० लाखांचा गुटखा अकोल्यात येत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली. गत अनेक दिवसांपासून या ट्रकवर पाळत ठेवून असलेल्या विशेष पथकाला हा ट्रक शनिवारी दुपारी घुसरमार्गे येत असल्याचे कळताच पथकाने या परिसरात पाळत ठेवली. दर्यापूर मार्गे येत असलेला हा गुटख्याचा साठा अकोट फैलातील एका ट्रान्सपोर्टवर उतरविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती. मात्र त्यापुर्वीच विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे यांनी सुमारे ५० लाख रुपयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील रावर हरपालसिंग राजपूत (६५) रा. जिंग्रा कॉलनी ता.जि. शिवरी मध्य प्रदेश, सोपरन रामवर राजपूत (२२) रा. जिंग्रा कॉलनी ता. जि. शिवरी मध्य प्रदेश, वहिद खान जागीर खान (४८) रा. बैदपुरा व श्यामसुंदर कृपाशंकर पांडे (४०) जय रिटेल लॉजिस्टिकचा डीलर रा. कैलास टेकडी सिंधी कॅम्प या चौघांना अटक करण्यात आली आहे. सदर गुटख्याचा साठा आता अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी व त्यांच्या पथकाने केली.