पातुरात एक दिवसीय आधुनिक शेळीपालन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:29 AM2020-12-05T04:29:47+5:302020-12-05T04:29:47+5:30
या चर्चासत्रात डॉ. भिकाने यांनी शेळीपालन व्यवसायातून दर्जेदार शेणखत निर्माण होते, क्षयरोगासारखे आजार शेळींच्या सहवासात दूर होते, अशा विविध ...
या चर्चासत्रात डॉ. भिकाने यांनी शेळीपालन व्यवसायातून दर्जेदार शेणखत निर्माण होते, क्षयरोगासारखे आजार शेळींच्या सहवासात दूर होते, अशा विविध फायद्यांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोबरागडे होत्या. त्यांनी शेळीव्यवसाय हा शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो व शेतीचा तोटा भरून काढण्यास मदत करतो, असे सांगितले. यावेळी प्रभारी पशुसंवर्धन सहायक उपायुक्त डॉ. उन्हाळे, शरद सिरसाठ, योगिनी सुरवाडे, चंद्रशेखर अंभोरे आदी उपस्थित होते. चर्चासत्राचे संचालन डॉ. के.वाय. देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका महिला आर्थिक विकास महामंडळ तथा तालुका लघू पशुचिकित्सालयाच्या सहका-यांनी परिश्रम घेतले. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला.