प्रभावी संवाद कौशल्य एक दिवसीय राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:29+5:302021-01-03T04:20:29+5:30
या प्रभावी संवाद कौशल्य राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नीलेश मडके हे होते. तर प्रमुख सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, प्रा. प्रवीण ...
या प्रभावी संवाद कौशल्य राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नीलेश मडके हे होते.
तर प्रमुख सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, प्रा. प्रवीण बोंद्रे, हभप सुनील महाराज लांजुळकर, सप्तखंजिरीवादक ऋषिपाल महाराज अनासने, राजीव खारोडे, मुकेश निचळ, नरेंद्र काकड, संतोष झामरे, प्रकाश गायकी, मनोज शर्मा, सय्यद अहमद, रामदास काळे यांची उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविक आशीष भटकर तर संचालन प्रा. प्रवीण बोंद्रे, आभार प्रदर्शन शिवछत्रपती साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संतोष खवले यांनी केले. यावेळी दोन सत्रात विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. परिषदेला संतोष विणके, रवींद्र इंगळे, संजय ताडे, गजानन चव्हाण, अजय रायबोले, आशीष साबळे, गजानन कोलखेडे, ॲड. संतोष खवले, सुरेश बुध, सुनील थोरात, निखिल खवले, हिंमत दंदी, हरिदास पंधरे, पी. आर. चंदन हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रणाली रोकडे, सुनीता रोकडे, अमेरून शहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
...........................
स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट
अकोट : तालुक्यातील अकोलखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वैभव-आंचल या ठोंबरे नवदाम्पत्याने छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेला पुस्तके भेट दिली.