अकोला मनपाच्या ३८ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 10:55 AM2020-10-28T10:55:26+5:302020-10-28T10:55:34+5:30
Akola Municipal Corporation ३८ कर्मचारी उशीरा आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिला आहे
अकोला : महापालीकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्याचे प्रमाण कायमच आहे. मंगळवारी आणखी ३८ कर्मचारी उशीरा आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिला आहे
मंगळवारी सकाळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्टरांची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण 38 कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले, त्यामध्ये विद्युत विभागातील 1, अतिक्रमण विभागातील 1, कस्तुरबा गांधी रूग्णालयातील 2, नागरी आरोग्य केंद्र डाबकी रोड येथील 1, एन.यु.एल.एम.कार्यालयातील 7, क्षयरोग कार्यालयातील 1, कर वसुली विभागातील 1, सामान्य प्रशासन विभागातील 1, विधी विभागातील 1, बांधकाम विभागातील 1, आरोग्य स्वच्छता विभागातील 1, मलेरिया विभागातील 5, आर.सी.एच. कार्यालयातील 2, समग्र शिक्षा अभियान विभागातील 2, पश्चिम झोन विद्युत विभागातील 4, उत्तर झोन कर विभागातील 6 आणि दक्षिण झोन विद्युत विभागातील 1 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे