मनपाच्या २२ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:07 AM2020-11-07T11:07:26+5:302020-11-07T11:07:41+5:30
Akola Municipal Corporation News महापालिकेत शुक्रवारी २२ कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले.
अकोला: अकाेला महापालिकेत शुक्रवारी २२ कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आले. त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये मनपा कार्यालयाच्या हजेरी रजिस्टरांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण २२ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यामध्ये आरसीएच कार्यालय १, एनयूएलएम कार्यालय ३, मलेरिया विभाग २, मोटार वाहन विभाग १, नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ४, आवक-जावक विभाग १, नगररचना विभाग १, आरोग्य (स्व.) १, विद्युत विभाग १, पूर्व झोन मलेरिया विभाग १, उत्तर झोन कर विभाग ३, उत्तर झोन जलप्रदाय विभाग २ आणि दक्षिण झोन विद्युत विभागातील १ असा समावेश आहे