भारतीय बौद्ध महासभेचे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:29+5:302021-07-25T04:17:29+5:30
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उद्घाटन झाले. अमोल वानखडे यांनी ...
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उद्घाटन झाले. अमोल वानखडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ताराचंद बोरकर यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यानंतर, केंद्रीय शिक्षक के.वाय.सुरवाडे, एस.डी. मोरे यांनी भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्टे व कार्ये, कार्यकर्त्याची आचारसंहिता, जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर, सुरेश इंगळे, कैलास ढोके, सुनील डोंगरदिवे, रंजना ढोके यांच्यासह काही निवडक प्रशिक्षणार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सूत्रसंचालन रामेश्वर इंगळे यांनी, तर आभार संदीप वाकोडे यांनी मानले. शिबिरात कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी रामेश्वर धंदर, गोवर्धन इंगोले, रवींद्र डोंगरे, प्रवीण फुले, दीपक कोकणे, हरिदास सावळे, निरंजन सरदार, राजू इंगळे, अजय इंगोले यांच्यासह तालुका, शहर व महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.