दिवसभरात एकाचा मृत्यू ; १७ नवे पॉझिटिव्ह, २९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 06:34 PM2020-10-18T18:34:14+5:302020-10-18T18:34:21+5:30
Akola, CoronaVirus अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६५ वर पोहचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या मात्र वाढतच आहे. रविवार, १८ आॅक्टोबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६५ वर पोहचला आहे. दरम्यान, दिवसभरात १७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८०५५ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये समर्थ नगर व सांगळूद येथील प्रत्येकी दोन, सिंधी कॅम्प, मलकापूर, कुटसा ता. अकोट, अनिकट पोलिस लाईन, भीम नगर, बाळापूर, आनंद नगर, आंबेकर नगर व अशोक नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जीएमसी, बोरगांव मंजू, कौलखेड व रिधोरा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
देशमुख फाईल भागातील पुरुषाचा मृत्यू
रविवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा रुग्ण देशमुख फाईल, रामदास पेठ येथील ६८ वर्षीय पुरुष असून, त्यांना ४ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.
२९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एका, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रीजेन्सी येथून एक अशा एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४५३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,०५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३३७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४५३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.