दिवसभरात एकाचा मृत्यू ; १८ नवे पॉझिटिव्ह; १७ जणांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:42 PM2020-10-19T18:42:38+5:302020-10-19T18:42:45+5:30
आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६६ वर पोहचला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या मात्र वाढतच आहे. सोमवार, १९ आॅक्टोबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६६ वर पोहचला आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७ व नागपूर येथील खासगी लॅबच्या चाचण्यांमध्ये एक असे १८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,०७५ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ७४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रणपिसे नगर येथील सहा जणांसहा सिंधी कॅम्प, एसपी आॅफिस जवळ, गोकुळ कॉलनी व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी सिव्हील लाईन, कौलखेड, घुसर, शास्त्री नगर, अकोट, डाबकी रोड व जीएमसी येथील प्रत्येक एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.
गोकुळ कॉलनीतील महिलेचा मृत्यू
सोमवारी आणखी गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ७२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस १७ आॅक्टोंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयुर्वेदिक महाविद्यालय, सूर्यचंद्र हॉस्पिटल, हॉटेल रिजेन्सी व आयकॉन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, अकोला अॅक्सिडेंट हॉस्पिटल व अवघते हॉस्पीटल येथून प्रत्येकी दोन अशा एकूण १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
४५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,०७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.