दिवसभरात एकाचा मृत्यू; ८० पॉझिटिव्ह, ६१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 06:21 PM2020-09-27T18:21:40+5:302020-09-27T18:21:57+5:30
रविवार, २७ सप्टेंबर रोजी बोरगाव मंजु येथील एक कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२५ वर गेला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून , रविवार, २७ सप्टेंबर रोजी बोरगाव मंजु येथील एक कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७१८८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८० अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १३ जणांसह अकोट येथील सात, छोटी उमरी, डाबकी रोड व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन, जोगळेकर प्लॉट, हिंगणा रोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुने शहर, पाथर्डी अकोट , वरुर, कुटासा, शिवापुर, कान्हेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये शास्त्री नगर येथील चार, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बार्शीटाकळी येथील दोन, कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
बोरगाव मंजू येथील महिलेचा मृत्यू
शनिवारी बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस २४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
६१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६, युनिक हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, तर कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून सहा अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१,५३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,१८८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.