धनेगाव येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:35+5:302021-05-25T04:21:35+5:30

वाडेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार, बाळापूर तालुक्यातील ...

One died of corona at Dhanegaon | धनेगाव येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

धनेगाव येथे एकाचा कोरोनाने मृत्यू

Next

वाडेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार, बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील एका ६६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

----------------

व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

अकोला : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग आजाराने कहर केल्यामुळे शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी होती़ त्याचा फटका लग्नसमारंभांवरसुद्धा बसल्याने लग्नसमारंभाशी निगडित बँड पथक, फोटोग्राफी, मंगल कार्यालय, फुले व्यवसाय, घोडेवाले इत्यादी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ त्यामुळे शासनाने मदत देण्याची गरज आहे. नियमांत शिथिलता द्यावी, अशी मागणी हाेत आहे.

----------------------

पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज

खिरपुरी : टाकळी खुरेशी ते गोरेगाव हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. खिरपुरी बु., खिरपुरी खु, टाकळी, नांदखेड, देगाव येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने येणे-जाणे करतात. पाणंद रस्त्यांची दैना झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

------------------

सिमेंटचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका

तेल्हारा : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.

---------------------

वीजपुरवठा नसल्याने शेतकरी अडचणीत

देगाव : परिसरातील देगाव, टाकळी खुरेशी, खिरपुरी भागात कृषी पंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोटेशन भरूनही काही शेतकऱ्यांना आजपर्यंत विद्युत जोडणी मिळालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़

------------------------

बाळापूर तालुक्यात केवळ एक पॉझिटिव्ह

बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, सोमवारी दिलासादायक चित्र दिसून आले. सोमवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यातील केवळ एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

------------------------

मासा येथे ११० जणांचे लसीकरण

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली असून, त्यानुसार अकोला तालुक्यातील पळसो प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत येत असलेल्या मासा येथे जिल्हा परिषद शाळेत कोविड-१९चे लसीकरण शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ११० नागरिकांनी लस घेतली.

------------------------------

चार महिन्यांपासून गृहरक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत!

अकोला : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा देणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यामुळे ते कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वेतन त्वरित देण्याची मागणी होत आहे.

----------------------

वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव!

आगर : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिसरात असलेल्या चोंडा, मोळखंड व चिंचखेड शेत तलावातील पाणी आटल्याने प्राणी गाव-वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे.

--------------------------------

बार्शिटाकळी तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह

बार्शिटाकळी : गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला शहरी भागात रुग्ण आढळून येत होते. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

----------------------------

खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर

अकोला : कोरोना संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना महागाई मात्र वरचढ होत आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही. शासनाकडून योजनेचे पैसे मिळत नाहीत. अशा अवस्थेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

------------------------------------

गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

मूर्तिजापूर : कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारू सहज उपलब्ध होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

--------------------------------------------------

तेल्हारा तालुक्यात रेती तस्करी जोमात

तेल्हारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत तालुक्यातील लिलाव न झालेल्या घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

--------------------------------------------------

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

बाळापूर : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. येथील समस्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी जिल्हा प्रशासनाने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी होत आहे.

----------------------------

खरप बु. परिसरात डासांचा प्रादुर्भाव

अकोला : शहरातील वाॅर्ड क्रमांक तीनमधील खरप बु. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात वराहांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन परिसरात फवारणी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: One died of corona at Dhanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.