मॉर्निंग वाॅक करीत असताना हृदयविकाराने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:33+5:302021-08-23T04:22:33+5:30
अकोट येथील डॉ. विवेक झुनझुनवाला यांचे वडील रमाकांत झुनझुनवाला (६३) हे दररोज मॉर्निंग वाॅकला जात होते. नेहमीप्रमाणे २२ ...
अकोट येथील डॉ. विवेक झुनझुनवाला यांचे वडील रमाकांत झुनझुनवाला (६३) हे दररोज मॉर्निंग वाॅकला जात होते. नेहमीप्रमाणे २२ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता घराबाहेर मॉर्निंग वाॅककरिता निघाले असता अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित रुग्णालयात नेत असताना मृत्यूने वाटेतच गाठले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)
------------
अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान
अकोट : तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील शालीकराम पांडे यांच्या शेतात अजगर असल्याचे समजताच सर्पमित्र योगेश दवंडे यांना येथील श्याम निमकर्डे यांनी माहिती दिली. योगेश दवंडे व त्यांचे सहकारी दीपक बुंदेले, मंगेश दवंडे, गणेश खंडारे यांनी अथक प्रयत्न करून अजगराला पकडून जीवदान दिले. अजगराला पकडून सर्पमित्रांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.
(फोटो)
------------------------