एक गणेश मंडळ, एक पोलीस कर्मचारी

By admin | Published: September 5, 2016 02:46 AM2016-09-05T02:46:51+5:302016-09-05T02:46:51+5:30

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षकांची संकल्पना.

One Ganesh Mandal, one police employee | एक गणेश मंडळ, एक पोलीस कर्मचारी

एक गणेश मंडळ, एक पोलीस कर्मचारी

Next

अकोला, दि. ४: जिल्हय़ात गणेशोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. १0 दिवस मोठय़ा भक्तिभावाने साजरा होणार्‍या या बाप्पांच्या सोहळय़ात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून एक गणेशोत्सव मंडळ एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. ह्यएक गाव, एक गणपतीह्ण या संकल्पनेच्या आधारे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्हय़ातील १ हजार ७७१ गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांमध्ये संवाद राहावा यासाठी २ हजार पोलीस कर्मचार्‍यांची गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस यांचा दुवा म्हणून कार्य करण्यासाठी नियुक्ती केली आहे. गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी ज्या एका पोलीस कर्मचार्‍याची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, त्या कर्मचार्‍याला सदर गणेशोत्सव मंडळासोबत संवाद ठेवून, मंडळ कोणते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार आहे, यासोबतच गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना कायदेविषयक माहिती देणे, आक्षेपार्ह सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कार्यक्रमाबाबत पुढील निर्णय घेणे या सर्व तांत्रिक बाबी ह्यएक गणेश मंडळ, एक पोलीस कर्मचारीह्ण मध्ये काम करणार्‍या समन्वयक पोलीस कर्मचार्‍यांना करावी लागणार आहे. गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांमध्ये दुरावा राहू नये, त्यांच्यात संवाद घडावा, यासोबतच गावामध्ये आणि शहरात तंटे किंवा किरकोळ वाद होऊन त्याचे परिणाम संपूर्ण जिल्हाभर दिसू नये यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशार मीणा यांनी ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस कर्मचार्‍यांना गणेशोत्सव मंडळाचा समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

Web Title: One Ganesh Mandal, one police employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.