देशभक्ती गीतांवर बालकांनी केले एक तास स्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:29 PM2019-01-28T13:29:32+5:302019-01-28T13:30:30+5:30

अकोला: सलग एक तास रोलर स्केटिंग खेळून आगळ ावेगळा वर्ल्ड रेकार्ड बुक आॅफ इंडियासाठी विश्वविक्रम करण्याचा उपक्रम शहरात शनिवारी प्रजासत्ताक दिनावर झाला.

One hour skating done by children on patriotic songs | देशभक्ती गीतांवर बालकांनी केले एक तास स्केटिंग

देशभक्ती गीतांवर बालकांनी केले एक तास स्केटिंग

Next

अकोला: सलग एक तास रोलर स्केटिंग खेळून आगळ ावेगळा वर्ल्ड रेकार्ड बुक आॅफ इंडियासाठी विश्वविक्रम करण्याचा उपक्रम शहरात शनिवारी प्रजासत्ताक दिनावर झाला.
अ‍ॅक्शन रोलर स्केटिंग क्लब व महाराष्ट्र स्केटिंग कोच यांनी आयोजित केलेल्या या विश्वविक्रमी स्केटिंग खेळ उपक्रमात तब्बल ४७ बालकांनी सहभाग घेऊन, देशभक्तीपर गीतांच्या तालावर स्केटिंग खेळून विक्रम केला. या व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रजासत्ताक दिनावर आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विप्लव बाजोरिया, मनपा नेते हरीश अलिमचंदानी, नगरसेविका उषा विरक, बीजीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा, प्रा. सत्यनारायण बाहेती, मनपा महिला बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य मनीषा उंबरकर, स्कॉलर्स किडस्च्या मुख्याध्यापिका राधिका कनोजिया, अ‍ॅक्शन रोलर स्केटिंग क्लब अध्यक्ष डॉ. रवी अलिमचंदानी, सचिव व संयोजक नरेंद्र अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी खासदार धोत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ केला. नरेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात बाल विद्यार्थ्यांनी स्केटिंगचे कौशल्य दाखवित एक तास स्केटिंग करून महानगराचे नाव कलेतही सर्वदूर गतिमान केले. मान्यवर अतिथींनी आपल्या मनोगतात शुभेच्छा बहाल केल्या. पालक दीपक सोनी व स्पर्धक बालकांनीही आपल्या प्रतिक्रिया देत या अभिनव स्पधेर्चे कौतुक केले.
यावेळी स्केटिंग असोसिएशनचे सचिव सचिन अमीन तथा पोदार शाळेचे क्रीडा शिक्षक नायर यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विध्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून उपक्रमास प्रारंभ केला. व्यवस्थापन पर्यवेक्षक सुगमचंद तापडिया विद्यालयाचे प्राचार्य दीपक बिरकड, दत्तगुरू अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजय अग्रवाल, राधिका कनोजिया यांनी केले. संचालन सविता अग्रवाल यांनी तर आभार प्रा. कैलास वानखडे यांनी मानले. यावेळी योगासन कोच महेश बग्रेट, आहार तज्ज्ञ कामिनी खान, मेघा बगडिया गांधी, प्रभाकर रुमाले, संजय मोहोड, सुनील दांदळे समवेत विद्यार्थी, पालक, असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो आहे

 

Web Title: One hour skating done by children on patriotic songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला