रानडुकराच्या हल्ल्यात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:15 AM2021-07-18T04:15:03+5:302021-07-18T04:15:03+5:30
--------------------------- रेतीचे अवैध उत्खनन सुरूच बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रेतीघाटांमधून रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून, प्रशासनाकडून कारवाई ...
---------------------------
रेतीचे अवैध उत्खनन सुरूच
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रेतीघाटांमधून रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाखो ब्रास रेतीची चोरी होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------
नांदखेड ते टाकळी रस्ता दुरुस्तीची मागणी
खिरपुरी : नांदखेड ते टाकळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने या मार्गावरून ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
-------------
लिंकचा खेळखंडोबा, ग्राहक झाले त्रस्त
अकोला : अनेक महिन्यांपासून येथील विमा कार्यालयामध्ये लिंक फेल असल्याकारणाने कामे खोळंबली आहेत. विमाधारकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. आज ना उद्या लिंकमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
--------------------
इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी
अकोट : खरीप हंगामाअंतर्गत शेती मशागतीची कामे झाली असून, आधुनिक पद्धतीने शेती मशागतीची कामे सुरू आहेत. पेट्रोल, डिझेलची वाढलेली किंमत परवडणारी नसल्याने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करावी, अशी मागणी आहे.
---------------------
सस्ती परिसरात वीजपुरवठा खंडित
पातूर : तालुक्यातील सस्ती परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाइन तसेच इतर कामे करताना सामान्य नागरिकांसहित कर्मचारी वर्गाला कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शासनाच्या शाळा, दवाखाना, बँक आदी विभागाची महत्त्वाची कामे सुरू आहेत.