बार्शीटाकळी येथे एक किलो गांजा जप्त            

By नितिन गव्हाळे | Updated: September 21, 2022 18:35 IST2022-09-21T18:35:11+5:302022-09-21T18:35:20+5:30

विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना बार्शीटाकळीतील घरातून गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

One kg ganja seized at Barshitakali | बार्शीटाकळी येथे एक किलो गांजा जप्त            

बार्शीटाकळी येथे एक किलो गांजा जप्त            

अकोला: पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी बार्शीटाकळी येथील खडकपुरा परिसरातील एका घरात छापा घालून एक किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीस अटक केली. 

विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना बार्शीटाकळीतील घरातून गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी शेख फिरोज शेख ईस्माइल याच्या राहत्या घरात छापा मारला असता, आरोपीकडे एक किलो गांजा आढळून आला. त्याची किंमत १० हजार रुपये आहे. आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: One kg ganja seized at Barshitakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला