पारस येथे मोटारसायकल अपघातात एक ठार, दोघे जखमी

By admin | Published: May 8, 2017 02:39 AM2017-05-08T02:39:20+5:302017-05-08T02:39:20+5:30

मोटारसायकलवरील अन्य दोघांपैकी एकजण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे

One killed and two injured in a motorcycle accident at Paras | पारस येथे मोटारसायकल अपघातात एक ठार, दोघे जखमी

पारस येथे मोटारसायकल अपघातात एक ठार, दोघे जखमी

Next

पारस : पारस-बाळापूर रस्त्यावर ६ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भरधाव मोटारसायकल निंबाच्या झाडावर धडकल्यामुळे एक युवक जागीच ठार झाला. मोटारसायकलवरील अन्य दोघांपैकी एकजण गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
मृतकाचे नाव मिथुन बाबुराव अंभोरे (२४) असून, तो पारसच्या बरड भागातील रहिवासी होता. शनिवारी दुपारी मिथुनसह त्याचे दोन मित्र मोटारसायकलने बाळापूरकडे जात असताना त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात मिथुन जागीच ठार झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. त्यापैकी एक गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. यापैकी गंभीर जखमी रुग्णास उपचारासाठी अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्‍या किरकोळ जखमी इसमावर अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले. मिथुन रोज मजुरीची कामे करीत असे. मिथुनच्या पार्थिवावर शनिवारी रात्री पारस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत प्रस्तुत वार्ताहराने पारस पोलीस चौकीतील व बाळापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचार्‍यांना विचारले असता सदर घटनेबाबत आपल्याकडे कसलीही माहिती अथवा तक्रार उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: One killed and two injured in a motorcycle accident at Paras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.