ट्रिपलसिट मोटारसायकल स्लीप झाल्याने एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:22+5:302021-01-13T04:46:22+5:30
या अपघातात पातूर तालुक्यातील बेलुरा बु. येथील सचिन जनार्धन कवळकार (३०) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अविनाश शांताराम नवलकार ...
या अपघातात पातूर तालुक्यातील बेलुरा बु. येथील सचिन जनार्धन कवळकार (३०) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अविनाश शांताराम नवलकार (३०) रा. सिंदखेड, अक्षय रुस्तम काळदाते (२१) रा. सिंदखेड हे गंभीर जखमी झाले आहेत. जुने शहर पोलीस स्टेशनकडून प्राप्त माहितीनुसार तिघेही ट्रिपलसिट (एमएच १४ एसजे १४४२) दुचाकीने पातूरकडे येत होते. दरम्यान, वरखेड फाट्याच्या वळणावर दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात घडला. जखमींना सास संघटनेचे दुलेखा युसुफ खा, आमदार नितीन देशमुख यांचे मित्र अजय देशमुख यांनी माणुसकीचा प्रत्यय देत तिघांना स्वतःच्या गाडीत तातडीने अकोला सर्वोपचारमध्ये हलवले. गंभीर जखमींपैकी एकाला नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे.
----------------
महामार्गाच्या कामाचा हाेताेय परिणाम
अकोला-मेडशीदरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही कडा भुसभुशीत झाल्या आहेत. त्यामुळे दुचाकी स्लीप होण्याचे प्रमाण वाढले आहे. गत आठवड्यात चार माेटारसायकली स्लिप झाल्या. त्यामध्ये काही जण जखमीसुद्धा झाले हाेते. पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशन करीत आहे.