दुचाकीस कारची धडक एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:20+5:302021-01-13T04:46:20+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपुरी शकुंतला रेल्वे गेटवर भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची ...

One killed in a two-wheeler collision | दुचाकीस कारची धडक एक ठार

दुचाकीस कारची धडक एक ठार

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपुरी शकुंतला रेल्वे गेटवर भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना १० जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

तालुक्यातील दहातोंडा येथील माजी प्राचार्य नामदेवराव सुखदेवराव राठोड (५९) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बीई २५६६ ने अकोट येथून लग्नसमारंभ आटोपून गावी परत येत हाेते. दरम्यान, लाखपुरी शकुंतला रेल्वे गेटवर समोरून भरधाव येणाऱ्या एमएच २७ एआर ७३२२ या कारने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारने धडक दिल्यानंतर अपघात स्थळावरून पळ काढला, परंतु काही नागरिकांनी कार नंबर घेतल्याने ती कार नेमकी कोणाची आहे, याचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed in a two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.