अमेरिकेत एक लाख भारतीय घेतात शिक्षण- टीबोर पी. नाझ

By admin | Published: February 6, 2016 02:24 AM2016-02-06T02:24:50+5:302016-02-06T02:24:50+5:30

डॉ.पंदेकृविचा ३0 वा दीक्षांत समारंभात १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान.

One lakh Indians take education in America - Teborough P Naz | अमेरिकेत एक लाख भारतीय घेतात शिक्षण- टीबोर पी. नाझ

अमेरिकेत एक लाख भारतीय घेतात शिक्षण- टीबोर पी. नाझ

Next

अकोला: अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठासह इतर विद्यापीठांमध्ये भारतातील जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारतात बहुराष्ट्रीय उद्योग अधिकाधिक गुंतवणूक करीत असल्याने त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला तर होईलच, महत्त्वाचे म्हणजे उच्च व तंत्र शिक्षणाला बळकटी येईल. याचा फायदा विद्यार्थ्यांंना होणार असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे टीबोर पी.नाझ यांनी शुक्रवारी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३0 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.या समारंभात १३८७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांंचे कौतुक करताना नाझ म्हणाले की, इतर शंभर देशांतील विद्यार्थ्यांंच्या तुलनेत अमेरिकेत आपले स्थान सिद्ध केले असूून, हे विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधन करीत आहेत. त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर अध्यापणाचे कामदेखील सुरू केले आहे. सर्वांंत महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा भारतीय विद्यार्थी मायदेशी परततील तेव्हा ते या देशात परिवर्तन आणण्यासाठी मोलाचे योगदान करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि अमेरिका यांच्या शैक्षणिक संस्थांमधील सहयोग आणि भागीदारीमुळे विज्ञान, उद्योग आणि कृषिक्षेत्रात प्रगती होत असून, दोन्ही देशांतील परस्पर संबंध अधिक दृढ होत असल्याचे ते म्हणाले. संपलेले वर्ष परिवर्तनाचे होते. सद्यस्थितीत अंतराळ, सहकार, सायबर सुरक्षा, जागतिक सुरक्षा, नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांमध्ये ३0 पेक्षा अधिक समूह आणि शासनस्तरावरील संवाद स्थापित झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषिक्षेत्रासमोरील आव्हाने, उत्पादकता व उत्पन्नवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी, साठवणूक प्रणालीच्या सशक्तीकरणासाठी आम्ही एकत्र काम करीत असून, जमीन व पाण्याच्या स्रोताच्या शाश्‍वत वापराच्या विकासासाठी संयुक्तपणे मार्ग शोधत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक, एकत्र काम, क्षमता, आत्मविश्‍वासाच्या बळावर भारत आणि अमेरिका लवकरच सर्व समस्यांवर मात करतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावर्षी कृषी अभ्यासक्रमाच्या विविध शाखांचे व कृषी अभियांत्रिकी शाखेचे मिळूून २0६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी १३८७ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून पदवी ग्रहण केली.

Web Title: One lakh Indians take education in America - Teborough P Naz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.