एक लाख वाहनधारकांकडे तीन काेटींचा दंड थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:48+5:302021-09-25T04:18:48+5:30

शहरासह जिल्ह्यातील सर्व वाहनधारक ज्यात दुचाकी, ऑटोरिक्षाचालक ज्यांच्यावर गत काही दिवसांमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड प्रलंबित आहे, ...

One lakh vehicle owners have been fined Rs | एक लाख वाहनधारकांकडे तीन काेटींचा दंड थकीत

एक लाख वाहनधारकांकडे तीन काेटींचा दंड थकीत

Next

शहरासह जिल्ह्यातील सर्व वाहनधारक ज्यात दुचाकी, ऑटोरिक्षाचालक ज्यांच्यावर गत काही दिवसांमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड प्रलंबित आहे, अशा वाहनचालक व वाहनमालक यांनी त्यांच्याकडे थकीत असलेला दंड त्वरित अकोला जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये, वाहतूक शाखेच्या काेणत्याही पाेलीस अंमलदाराकडे तसेच वाहतूक शाखा कार्यालयात भरून पावती घ्यावी. दंड भरण्याची सुविधा २४ तास राहणार असून, दंड न भरल्यास अशा वाहनचालकांना नाेटीस पाठविण्यात येणार आहे.

आजच्या लाेकअदालतीमध्येही हाेणार तडजाेड

जिल्ह्यातील एक लाख १२ हजार वाहनचालकांकडे तब्बल तीन काेटी रुपयांचा दंड थकीत असून, हा दंड भरण्यासाठी २५ सप्टेंबर राेजी जिल्हा न्यायालयात आयाेजित लाेकअदालतमध्येही सुविधा करण्यात आली आहे. ज्या वाहनचालकांकडे दंड थकीत आहे, त्यांनी तडजाेड करून दंडाची रक्कम लाेकअदालतमध्येही भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी केले आहे.

Web Title: One lakh vehicle owners have been fined Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.