तेरवीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांला दिली एक लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:22 AM2021-09-06T04:22:44+5:302021-09-06T04:22:44+5:30
तेल्हारा: पूर्वापार चालत आलेल्या तेरवी, दसवा यांसारख्या रूढी परंपरांना फाटा देत, शहरातील देशमुख परिवाराने आईच्या तेरवीचा कार्यक्रम रद्द करून ...
तेल्हारा: पूर्वापार चालत आलेल्या तेरवी, दसवा यांसारख्या रूढी परंपरांना फाटा देत, शहरातील देशमुख परिवाराने आईच्या तेरवीचा कार्यक्रम रद्द करून शाळांसाठी तब्बल एक लाख रुपयांची देणगी देऊन नवा आदर्श घालून दिला. ़
तालुक्यातील ग्राम अकोली रूपराव येथील रहिवासी, तसेच सध्या तेल्हारा येथे राहणारे कृष्णराव देशमुख यांच्या पत्नीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून समाजासमोर एक आदर्श ठेवत, स्व.कल्पनाताई कृष्णराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृष्णराव देशमुख, प्रा.नितीन कृष्णराव देशमुख, सागर देशमुख अकोलीकर यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून शहरातील श्री शिवाजी हायस्कूल शाळेला ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला, तसेच धारणी येथे नोकरीसाठी असलेले नितीन देशमुख हे वसंतराव नाईक विद्यालयाला ५१ हजारांचा धनादेश येत्या काही दिवसांत होतकरू विद्यार्थ्यांच्या हितासाठी देण्याचे शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमावेळी सांगितले, तसेच श्रद्धांजली कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्यांना पुस्तकांचे वाटप केले. कार्यक्रमाला नितीन देशमुख ठाणेदार तेल्हारा, सुधीरबापू देशमुख सदस्य शाळा समिती, नानासाहेब देशमुख तुदगावकर, गोपाळराव खेडकर महाविद्यालय प्राचार्य गोपाल ढोले, गजानन देशमुख, जितेंद्र देशमुख, प्रा.भैयासाहेब देशमुख, प्रा.नितीन देशमुख, शांतीकुमार सावरकर, एस.टी.वंजारी, बी.जी.पवार, श्रीकांत सपकाळ आदी उपस्थित होते.