काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यू

By Atul.jaiswal | Published: August 17, 2023 11:32 AM2023-08-17T11:32:59+5:302023-08-17T11:33:17+5:30

यातील एकाचा हात पकडण्याचा दोन वेळा आटोकाट प्रयत्न केला परंतु तीघांनाही पोहण येत नसल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले

One of the three youths who went swimming in Katepurna Dam drowned | काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यू

काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यू

googlenewsNext

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (१६ ऑगस्ट) घडली. उर्वरित दोघा युवक सुरक्षितरित्या बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले. 

खिजर अहमद शब्बीर अहमद (बार्शीटाकळी), सय्यद कौसेन सय्यद सलीम व मोहम्मद दानिश मोहम्मद अबिद (भातकुली जिल्हा अमरावती) हे तिघे बुधवारी महान येथील काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेले होते.  तीघांनाही पोहन येत नसल्याने तीघांनीही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत एकमेकांना पकडुन धरणात उतरले. थोडया अंतरावर चालत गेले असता पाण्याच्या लाटा अंगावर आल्या. लाटा डोक्यावरुन जाऊ लागल्याने तोल सुटला व एकमेकांचे हात सुटले. यात  सय्यद कौसेन सय्यद सलीम  आणि मो. दानीश मोहम्मद आबीद हे काठावर आले. परंतु यातील खीजर अहेमद शब्बीर अहेमद हा खोल पाण्यात ओढल्या गेला.  यावेळी त्यानेही यातील एकाचा हात पकडण्याचा दोन वेळा आटोकाट प्रयत्न केला परंतु तीघांनाही पोहण येत नसल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले अन शेवटी खीजर अहेमद हा पाण्यात बेपत्ता झाला.

 हे युवक घाबरलेले असल्याने त्यांनी घटनेबाबत घरच्यांना रात्री उशीरा सांगीतले. याबाबत माहिती मिळता बार्शीटाकळी पोलीस व पिंजर पोलिसांनी जीवरक्षक दीपक सदाफळे व त्यांच्या चमूला रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी धरणावर पाठविले. रात्री २:३० वाजताच्या सुमारास बचाव पथकाला खोल पाण्यात खीजर अहमदचा मृतदेह सापडला.  यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ,महान बीट चे दत्तात्रय चव्हाण, रायटर स्वप्नील बडगे, बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भुषण मोरे, कॉन्स्टेबल नागसेन वानखडे, अमित सुगंधी उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली.

Web Title: One of the three youths who went swimming in Katepurna Dam drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.