महाराष्ट्रातून दररोज गुजरातला चालला एक हजार ट्रक कापूस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:50 PM2017-11-11T18:50:54+5:302017-11-11T18:57:33+5:30
- राजरत्न शिरसाट
अकोला: राज्यातील कापूस हमीदराने खरेदी केला जात नसून, बोनसची शक्यता नसल्याने येथील शेतकºयांवर शेजारच्या गुजरात राज्यात कापूस विकण्याची पाळी आली आहे. गुजरातमध्ये बºयापैकी दर असल्याने येथून दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर (वस्तू व सेवा कर)होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर गुजरात सरकारने प्रतिक्ंिवटल ५०० रू पये बोनस जाहीर करू न तेथील कापूस उत्पादक शेतकºयांना खूष करण्याचा प्रयत्न केला.म्हणजचे हमीदर प्रतिक्ंिवटल ४,३२० आणि बोनस ५०० रू पये असा ४,८२० रू पये शेतकºयांना मिळत आहेत.येथील कापसाचे दर अद्यापही ३,८५० ते ४,२०० रू पये प्रतिक्ंिवटल असून, प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने कापसाचे दर ४ हजाराच्या आतच आहेत.गुजरातमध्ये प्रतिक्ंिवटल ४,२०० रू पयाच्यांवर कापसाचे दर मिळत असल्याने येथील शेतकºयांनी गुजरातमध्ये कापूस पाठविण्याचा धडाका सुरू केला आहे. मराठवाडा,खान्देश, विदर्भातून हा कापूस गुजरातमध्ये पाठवला जात असून, अनेक ठिकाणी याकामासाठी गुजरातच्या व्यापºयांनी या कामासाठी एजंट नेमले आहेत.
यावर्षी कापूस पीक जोरदार असून,मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात महाराष्टÑातील कापसाची आवक दररोज २ लाख २५ हजार क्ंिवटलपर्यंत एवढी वाढली . पण दर नसल्याने उत्पादन खर्चही कठीण असल्याने शेतकरी गुजरातला कापूस पाठवत आहे. गुजरातला येथून दरवर्षी कापूस जातच असतो पण यावर्षीचे प्रमाण हे दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजे दररोज एक हजार ट्रक आहे.एका ट्रकमध्ये जवळपास शंभर क्ंिवटल कापूस असतो हे विशेष.याचा फटका राज्याच्या वस्तू व सेवा करावर होत आहे.
राज्यातील शेतकºयांना बोनसची प्रतीक्षा
राज्यात यावर्षी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे पण शासकीय कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारी, ओलाव्याचे निकष लावले जात असल्याने शेतकºयांना त्याचा कापूस व्यावाºयांनाच विकावा लगात आहे. व्यापाºयांकडून हमीपेक्षा कमी दराने कापसाची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांनी गुजरातला कापूूस पाठवणे सुरू केले आहे.अनेक शेतकºयांनी बोनसच्या प्रतीक्षेत कापूस राखून ठेवला आहे.
- गुजरातला कापसाचे दर बºयापैकी असल्याने येथील शेतकरी दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातला पाठवत आहे. तेथील व्यापाºयांना बोनसचा लाभ होणार असल्याने कापसाची मागणी वाढली आहे.
वसंत बाछुका, कापूस उद्योजक,अकोला.