दिवसभरात एकाचा बळी; ८२ पॉझिटिव्ह,२८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:05 PM2020-08-28T19:05:19+5:302020-08-28T20:02:46+5:30
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४८ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, २८ आॅगस्ट रोजी पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४८ वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७, नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे २५ व रॅपिड चाचण्यांमध्ये १० असे एकूण ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,७७५ वर पोहचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी २५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, २०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामध्ये मुर्तीजापूर शहरातील १५, डाबकी रोड अकोला येथील चार, तेल्हारा येथील तीन, जुने शहर येथील दोन, किर्ती नगर येथील दोन, अकोट येथील दोन, बाजोरीया हाऊस येथील दोन, मुर्तीजापूर तालुक्यातील सांजापूर, तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार, पातूर तालुक्यातील गावंडगाव, सिंधी कॅम्प , मलकापूर, मराठा नगर, पातूर तालुक्यातील पिंपळखुटा, महादेव नगर, म्हैसांग, रामदास पेठ, हिंगणा फाटा , हरिहर पेठ , पंचशील नगर, आगर, हिवरखेड व अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आलेगाव येथील महिलेचा मृत्यू
शुक्रवारी पातूर तालुक्यातील आलेगाव येथीला ७३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेस २२ आॅगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
खासगी प्रयोगशाळेचे २५ अहवाल पॉझिटिव्ह
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेले नमुणे तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्र्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
रॅपिड चाचण्यांमध्ये १० पॉझिटिव्ह
शुक्रवारी दिवसभरात झालेल्या १९८ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात सात, आयएमएच्या कॅम्पमध्ये एक, तर वैद्यकीय कर्मचाºयांपैकी एक असे एकूण १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १२२७१ चाचण्यांमध्ये ६९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
२८ जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३, ओझोन हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन जणांना अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५०९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,७७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३११८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५०९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.