महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीला एक वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 01:24 AM2016-09-22T01:24:28+5:302016-09-22T01:24:28+5:30
विवाहितेचा केला होता विनयभंग.
वाशिम, दि. २१- विवाहित महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीला कारंजा येथील विद्यमान न्यायालयाने एक वर्षे कैद, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १0 दिवस कैद अशी शिक्षा १९ सप्टेंबर रोजी सुनावणी आहे.
धनज बु. पोलीस स्टेशन अंतर्गत कामरगाव येथील २५ डिसेंबर २0१५ रोजीची ही घटना आहे. फिर्यादी महिला ही तिच्या पती व मुलीसोबत दवाखान्यात गेले होते. दवाखाना आटोपून परत येत असताना जिल्हा परिषद शाळेजवळील वळण रस्त्यावर, तिचा पती व मुलगी हे मेडिकलवर औषध आणण्यास गेले. तेवढय़ात आरोपी तमीज शाह वल्द बिस्मील्ला शाह हा मोटारसायकलवर आला आणि फिर्यादी महिलेचा हात धरून विनयभंग केला. ही घटना सदर पीडित महिलेने पतीजवळ कथन आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३५४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस जमादार शंकर जाधव यांनी घटनेचा त पास करुन २८ डिसेंबर २0१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी कारंजा येथील विद्यमान न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीस १ वर्षे कैद, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १0 दिवस कैद अशी शिक्षा सुनावली. पीडित महिलेची बाजू सरकारी वकील साधना सरकटे यांनी पाहिली तर आरोपीची बाजू अँड.बंडाळे यांनी मांडली. या घटनेचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन धनज बु., ठाणेदार राहुल आठवले व पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, हे.काँ.शंकर जाधव व पो.काँ. पठाडे यांनी केला.