ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:50+5:302021-04-22T04:18:50+5:30
मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तीळासह फळपिकांचे नुकसान ...
मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तीळासह फळपिकांचे नुकसान झाले होते. अशात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली. काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत होता. मात्र, जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात हवामान विभागाने विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाळी कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
--बॉक्स--
तापमानात घट; पारा ३९.१ अंशांवर
जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट पाहावयास मिळाली. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४१.९ अंश सेल्सिअस होता. तापमान वाढण्याची शक्यता असताना बुधवारी पारा घसरून ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.